पैठणच्या नाथसागर जलाशयातील पाण्याचे वेगाने होतेय बाष्पीभवन; प्रशासनाच्या चिंतेत वाढ

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एप्रिलच्या मध्यावरच उष्णतेच्या तीव्र झळा बसू लागल्या असून तज्ज्ञांसह हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाथ सागरातील बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची दाट शक्यता असून, पाणीसाठ्यावर मोठा ताण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसह सर्वच घटकांनी पुढचा विचार करून उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, अन्यथा आगामी काळात मो ठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, अशी भीती जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांसह जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जायकवाडी धरण प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५१२.५९ फूट (४६१.०३७ मीटर) नोंदवण्यात आली आहे. धरणात सध्या १९२८. ३१७ द. ल. घ. मी. एकूण पाणीसाठा असून, त्यापैकी ११९०.२११ द. ल. घ. मी. जिवंत साठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, यंदा पाणीसाठा ५४.८२ टक्के असून, गततर्षी याच दिवशी तो ४६.५६ टक्के एवढा होता. तुलनात्मकदृष्ट्या यंदा स्थिती समाधानकारक असली तरी संभाव्य उष्णतेची लाट पाणीसाठा जलदगतीने कमी करू शकते.

जायकवाडीतून छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, बीड आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील सुमारे २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. यामध्ये डाव्या 66 पाणीसाठा सध्या समाधानकारक असला तरी वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. 

शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पिकांचे नियोजन करावे. प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग. व उजव्या कालव्यांसह उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सिंचनासोबतच औद्योगिक वसाहती आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही जायकवाडी प्रकल्पावर अवलंबून असल्याने आगामी काळात पाण्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान जलसंपदा प्रशासनासमोर असेल.